शहर

तिरंगा चौकातील खड्ड्याची पूजा करून काँग्रेसचे गांधी आंदोलन

खड्डा बुजविण्यासह रखडलेली रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी

 

नांदेड : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील तिरंगा चौक परिसरात रस्त्याचे काम करण्यासाठी खोदण्यात आलेला खड्डा अनेक दिवसांपासून तसाच राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे यजीराबाद ब्लॉक अध्यक्ष एस. दीपकसिंग हुजुरिया यांनी गांधीवादी पद्धतीने अनोखे आंदोलन केले.

रस्त्यावर खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्याची प्रतीकात्मक पूजा करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. खड्ड्यामुळे परिसरातील नागरिक, पादचारी तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. संबंधित विभागाने रस्त्याचे काम सुरू करून खड्डा तातडीने बुजवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तिरंगा चौक हा वर्दळीचा परिसर असल्याने या ठिकाणी रस्त्यावरील अडथळ्यांमुळे वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. विकासकामांसाठी खोदकाम करणे आवश्यक असले तरी काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे आणि नागरिकांची गैरसोय टाळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

या गांधी आंदोलनात अरुण काबरा, संजय वाघमारे, संदीप पाटील, ज्योती कदम, छाया करनसिंग बैस यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रखडलेले काम

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *