‘मुरासू’ चक्रीवादळामुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीत बदल

‘मुरासू’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने काही रेल्वेगाड्यांच्या वेळेत आणि काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
उशिराने सुटणारी गाडी:
गाडी क्र. 17638 तीरुचानुर – जालना हि गाडी दिनांक 3 नोव्हेंबर 2026 रोजी तीरुचानुर येथून 360 मिनिटे (06 तास) उशिराने धावेल.
परावर्तीत मार्गाने धावणारी गाडी:
गाडी क्र. 17405 तिरुपती–आदिलाबाद हि गाडी तिचा मूळ मार्ग सोडून रेनिगुंटा, गुटी, गुंटकळ, रायचूर, सुलेहाली, विकाराबाद, सिकंदराबाद आणि बोलारम या परावर्तीत मार्गाने धावेल. तसेच मूळ मार्गावरील रेनिगुंटा ते बोलारम दरम्यानचे थांबे वगळण्यात येतील.
प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत करण्यात येत आहे.



