जिला

जिल्हा परिषदत आजपासून तीन दिवस उमेदचा भव्य दिवाळी महोत्सव; महिला बचतगटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन

नागरिकांनी भेट देऊन महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे; मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन

 

नांदेड, 3- उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच दिवाळीनिमित्त पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या फराळाच्या पदार्थांचे भव्य विक्री प्रदर्शन आजपासून नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

दिनांक 4 ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, गृहउपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, आकर्षक उत्पादने तसेच दिवाळीचे विविध प्रकारचे पारंपरिक फराळ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी कष्टातून आणि कौशल्यातून तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे, महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

तरी नागरिकांनी या दिवाळी महोत्सवाला आवर्जून भेट देऊन महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या वस्तू व पारंपरिक फराळाची खरेदी करावी. यामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही हातभार लागेल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक परीक्षित यादव व उमेद- जिल्हा अभियान व्यवस्थापक बालाप्रसाद जंगीलवाड यांनी केले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *