जिला
MPSC परीक्षेत यश नगमा नब्बू शेख यांची टॅक्स असिस्टेण्ट ऑफिसर पदी निवड

किनवट (अकरम चव्हाण)
जिद्द, मेहनत आणि कठोर परीश्रमातून मिळणारे यश किती मोठा असत हे एका मुस्लिम मुलीने दाखवून दिला आहे. याचे उदाहरण किनवट तालुक्यातील निचपुर येथील नगमा नब्बू शेख या मुस्लिम मुलीने दाखवून दिले आहे. अत्यंत जिद्दीने व कठोर परिश्रमातून MPSC परीक्षेमध्ये यश मिळवत TAX ASSISTANT OFFICER पदी निवड झाली. व महाराष्ट्रातून खुला प्रवर्ग मुली मधून १५ वी रैंक आणि मंत्रालय लिपिक महाराष्ट्रातून १० वी रैंक मिळवली आहे. अशा दोन्ही पदावर चांगल्या प्रकारे यश मिळवल आहे. व मिळालेल्या यशाची तालुक्यामध्ये सर्वत्र चर्चा होत आहे. नगमा ताई ला गावकऱ्यांच्या वतीने व शेख कुटुंबीयांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व किनवटचे माजी आमदार यांनी नगमा च सत्कार करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या



