जिला
पोलीस स्टेशन माळाकोळी अंतर्गत सन 2023 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचा पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या हस्ते सत्कार….

भिमजयंतीच्या अनुशंगाने माळाकोळी पोलीस स्टेशन येथे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. आबीनेश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री मारोती थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे माळाकोळी येथे शांतता कमीटीची मीटींग घेण्यात आली व त्या भिमजयंती मंडळाची नियम अटी, शर्ती ठरवुन यावर्षी शांततेत भिमजयंती मिरवणुक पार पाडलेल्या मंडळाना बक्षिसे देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
2023 मध्ये माळाकोळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ मौ. मंगरूळ यांना प्रथम क्रमांक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ माळेगाव द्वितीय क्रमांक, डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती मंडळ माळाकोळी तृतीय क्रमांक पटकावला.
सदर भिमजयंती मंडळाने बक्षीस वितरण समीतीने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करून स्वतःचे स्वयंसेवक तयार करून मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. वादयाच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात आले. व्यसनमुक्त मिरवणुका काढण्यात आल्या. अशा प्रकारे शांततेत मिरवणुका पार पाडल्या. सदर मुरवणुकी करीता श्री संजय निलपत्रेवार, सपोनि पोस्टे माळाकोळी व स्टाफ यांनी सर्व भिमजयंतीला चांगल्या प्रकारे बंदोबस्त लावुन शांततेत मिरवणुका पार पाडल्या. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवु दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत मंडळाचे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी स्मृती चिन्ह देवून सत्कार केला. व सर्व मंडळाचे आभार मानले.



