जिला

मीनल करनवाल नांदेड जि.प. नव्या सीईओ, वर्षा ठाकूर यांची लातूर जिल्हाधिकारीपद वर पदोन्नती,

 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर यांची बदली लातूर जिल्हाधिकारी म्हणून तर त्यांच्या रिक्त जागी नंदुरबार येथून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांची बदली करण्यात आली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच राज्य सरकारने राज्यातील तब्बल ४९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आले आहेत.
राज्यातील काही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी बदल्यांचे आदेश जारी केले. यात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची पदोन्नतीने लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नंदुरबार येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2019 बॅचच्या आहेत.
राज्यातील प्रशासनात मोठे बदल झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा झालेला विस्तार आणि सध्या सुरू असलेले अधिवेशन
पाहता या बदल्या महत्त्वपूर्ण आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *