क्राईम

शिवाजी प्रभाकर माने व अविनाश भारत नंदाणे इतवारा पोलीसानी केले जेरबंद

पोलीस स्टेशन इतवारा, नांदेड गु.र.नं. 222/2023 कलम 302,34 भा.द.वि.सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा मधील दोन्ही आरोपीतानी इतवारा पोलीसानी केले जेरबंद
दिनांक 17.07.2023 रोजी इतवारा पोलीस ठाणे हदीतली चौफाळा येथील सार्व. पाण्याचे टाकीखाली असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये मयत नामे किरन भास्कर माने हा त्याचे मित्रासमवेत दारू पित बसला होता. त्या संधीचा फायदा घेत आरोपी नामे शिवाजी प्रभाकर माने व त्याच साथीदार आरोपी भाऊ ऊर्फ अविनाश भारत नंदाणे यानी संगणमत करून मयताचे आरोपीच्या मेव्हनच्या मूली सोबत असलेल्या प्रेम संबंधाचा राग मनात धरून खंजरी ने वार करून खून करून दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यावरून पोलीस स्टेशन इतवारा, नांदेड गु.र.नं. 222 / 2023 कलम 302,34 भा.द.वि.सह कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि संग्राम जाधव हे करत आहेत.
सदर आरोपीचा अत्यंत गोपनिय रित्या शोध घेवून आरोपी नामे 01 शिवाजी प्रभाकर माने 02. भाऊ ऊर्फ अविनाश भारत नंदाणे यास लोहा येथून अटक केली आहे. आरोपीना मा. न्यायायात हजर केले असता मा. न्यायालयानी 05 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अ. पोलीस अधिक्षक श्री अविनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सूनिल नायक व पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संग्राम जाधव, पोउपनि असद शेख, पोहेकॉ 664 हाके, पो.अ. 493 गायकवाड , पो.अं. 471 देशमुख, पो. अं. 2908 जगताप, पो.अं. 3065 राठोड यानी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *