क्राईम

इसमांना शस्त्राचा धाक दाखवुन जवरी चोरी करणारी टोळी जेरबंद, मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही

किनवट येथील कंदोरी करत असलेल्या इसमांना शस्त्राचा धाक दाखवुन जवरी चोरी करणारे, मोक्कयामधील फरार असणारे व शहरातील मोटार सायकल चोरी करणारे एकुण 14 आरोपी, 08 मोटार सायकल, 02 अग्रीशस्त्र व नगदी 1,25,000/- रुपये असे एकुण 5,95,000/- रुपयाचा

मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही
दिनांक 18/07/2023 रोजी पोलीस ठाणे किनवट हद्यीमध्ये कंदोरी करत असलेल्या काही इसमांना अज्ञात चोरटयांनी शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी केली होती. सदर प्रकरणात पोलीस ठाणे किनवट गुरनं. 184 / 2023 कलम 392,342,34 भा. दं. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर प्रकरणातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबतचे सुचना मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 21/07/2023 रोजी पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे किनवट हद्यीमध्ये जबरी चोरी करणारे आरोपी पैकी काही आरोपी इतवारा, नांदेड परीसरात असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन वरीष्ठांचे आदेशाने स्वत: पुढाकार घेवुन स्थागुशाचे वेगवेगळया तिन टिम तयार करुन एक टिम संघर्ष नगर, इतवारा नांदेड येथे दुसरी टिम खडकपुरा, नांदेड व तिसरी टिम गुरुव्दारा परीसरात रवाना करुन तिनही ठिकाणहुन आरोपी नामे 1) सय्यद इम्रान सयद इसाक वय 27 वर्ष व्यवसाय बेकार रा. धनेगाव नांदेड ह मु. खडकपुरा, नांदेड 2 ) विकास चंद्रकांत कांबळे वय 20 वर्ष रा. पळसा ता हदगाव जि नांदेड ह. मु. धनेगाव नांदेड 3) मुकेश ऊर्फ एम. जे. पि. चंदन जोगदंड वय 23 वर्ष रा. संघसेननगर, इतवारा नांदेड 4) चंद्रशेखर ऊर्फ चंद्र पि देवराव पाईकराव वय 23 वर्ष रा. संघसेननगर, इतवारा नांदेड 5) प्रशिक ऊर्फ परश्या ऊर्फ रॉनी पि. दिलीप ओढणे वय 24 वर्ष रा. संघसेननगर, इतवारा नांदेड 6 ) ज्ञानेश्वर ऊर्फ डॅनी पि. अनिरुद्र गाडगे वय 22 वर्ष रा. सेलगाव ता अर्धापुर जि नांदेड 7) सयद सोहेल पि सयद नुर वय 21 वर्ष रा. खुदवेनगर चौरस्ता नांदेड 8) शेख मुवीन शेख गौस वय 21 वर्ष रा खुदवेनगर चौरस्ता, नांदेड 9) वैभव शिवराम गुरव वय 22 वर्ष रा. व्यंकटेश नगर, अंशुमनसिंघ राजेंद्रसिंघ मिलवाले वय 18 वर्ष रा. गुरुव्दारा गेट नंबर 5 नांदेड 11 ) सिताराम उत्तम काळे वय 25 वर्ष रा पळसा ता हदगाव जि नांदेड 12 ) एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन पो. स्टे. किनवट हद्दीतील जबरी चोरी बाबत विचारपुस करता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करुन नांदेड 10)
त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले 02 पिस्टल (अग्नीशस्त्र), 01 जिवंत काडतुस, 01 एअरगण, 01 तलवार, 02 खंजर, 03 मोटार सायकल व गुन्हयातील जबरी चोरी केलेले नगदी 1,25,000/- रुपये जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीतांना पुढील तपासकामी पो स्टे किनवट येथे तपासकामी देण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *