मराठवाडा

परभणी भीमशक्ती संघटनेची आढावा बैठक संपन्न-विवीध ठराव घेण्यात आले

परभणी /परभणी जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बारी/- १ सप्टेंबर  रोजी  परभणी जिल्हा भीमशक्ती संघटनेची आढावा बैठक संपन्न या बैठकीत संघटनेचे परभणी जिल्हा निरीक्षक मा. प्रमोदकुमार रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे, संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्या संघटना ,मनुवादी बिजेपी सरकार विरोधात तीव्र निषेध करण्यात आला तसेच  संघटनेच्या बऱ्याच विषयावर गहन चर्चा करण्यात आली आणि  दोन ठराव पारित करण्यात आले 1- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील  तीन दलित युवकांना कबुतर चोरल्याचा संशयावरून, झाडाला उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आली.हा जातीय अत्याचारच आहे आणि तो जातीयवादी मानसिकतेतून घडलेला आहे. या घटनेचा तीव्र निषेधा चा ठराव.
2– माजी मंत्री चंद्रकांत जी हांडोरे साहेबांचाअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) काँग्रेस वर्किंग कमिटी ( CWC) मध्ये कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केल्या बद्दल मा. श्रीमती सोनिया गांधीजी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच सरचिटणीस मा. राहुल जी गांधी यांचा अभिनंदन व आभर ठराव घेण्यात आला .
यानंतर बैठकीस आलेले प्रमुख राज्यपदाधिकारी मा. प्रमोदकुमार रत्नपारखे सरचिटणीस मा. विजयकुमार सुखदेव राज्यउपाध्यक्ष, मा. पंडितभाई नवगिरे राज्य सरचिटणीस, मा. संतोष भिंगारे मराठवाडाअध्यक्ष, मा. भास्करदादा साळवे मराठवाडा उपाध्यक्ष, , मा. चक्रवती वाघमारे मराठवाडा उपाध्यक्ष, मा. बाबुराव केळकर, जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, शहर अध्यक्ष विक्रम काळे, प्रवक्ते सुहास पंडित, सर्वश्री तालुका अध्यक्ष राहुल कनकुटे,शैलेश वडमारे, युवराज कांबळे तसेच सतीश आळसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बठकीत जिल्हयातील व  तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होतेतर सुत्र संचालन व्हावुळे सर  तर आभार    भाऊराव  कंठाळे यांनी मानले तसेच आढावा बैठक संपन्न करण्याकरिता बबन व्हावुळे, राहुल कनकुटे, अंकुश वानखेडे, महादेव ठोंबरे, सुरेश यादव, प्रभाकर ढेंबरे, विलास साळवे, आकाश वंजारी आदींनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *