क्राईम

अवैद्यरित्या 12 तलवारी व 11 खंजर बाळगणारा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

 

नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे टिमला आदेश दिले होते.

दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सतर्कता जनरल स्टोअर्स नगीनाघाट नांदेड येथे एक इसमस अवैध्य रित्या तलवारी व खंजर विक्रीसाठी बाळगुन आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे परमजितसिंघ महेंद्रसिंघ रामगडीया वय 40 वर्ष रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे सतर्कता जनरल स्टोअर्स मध्ये अवैध्य रित्या 12 तलवारी व 11 खंजर किंमती 35500/- रुपयाचे विनापरवानगी बेकायदेशिर रित्या विक्रीसाठी बाळगुन मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोलीस ठाणे वजीराबाद गुरनं. 536/2023 कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पोलीस ठाणे वजीराबाद यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपरपोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि परमेश्वर चव्हाण, पोहेकॉ/ शंकर म्हैसनवाड, संभाजी मुंडे,ज्वालासिंघ बावरी, चालक कलीम शेख स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *