मराठवाडा
उरूस उत्सवाचे गुरुवारी उदघाटन, मोठ्या संख्येने हजेरी लावा- डॉ फौजिया खान

परभणी उरूस उत्सव -२०२४ चे उदघाटन दिनांक ०१.०२.२०२४ रोजी गुरुवारी संध्याकाळी सात वाजता होणार आहे. परंपरागत शासकीय मान जिल्हाधिकारी यांना असल्याने औपचारिक उदघाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जिल्ह्याचे खासदार संजय बंडू जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आ. बाबाजानी दुर्राणी, आ.मेघनाताई बोर्डीकर, आ. डॉ राहुल पाटील, आ. रत्नाकर गुट्टे यांच्या सोबत पोलीस अधीक्षक रागसूधा आर मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री विनय मून, वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोईन ताशीलदार, परभणी मनपा च्या आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर हे मान्यवर निमंत्रित असून सिव्हिल सर्जन श्री नागेश लखमवार,महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री आर. बी. माने, वक्फचे उप मुख्य कार्यकरी अधिकारी श्री जुनेद सय्यद व विशेष अधीक्षक श्री मुशीर शेख हे विशेष निमंत्रित असणार आहे. परभणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा असे आवाहन डॉ फौजिया खान यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कव्वाली- मुशायरा
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही अनेक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.यात कव्वाली, मुशायरा,सुफी संगीत,गजलांची मैफिल सजणार आहे. खासदार डॉ फौजिया खान यांच्या पुढाकाराने या वर्षी महिलांसाठी दोन दिवस मीना बाजार आयोजित होत आहे. तसेच बज्म-ए-ख्वातीन कार्यक्रमाचे आयोजन घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे.
या शिवाय परभणी येथील नागरीकांना सर्व भौति क सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नरत आहे. यात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मी महीला रुग्णालयाकरीता केंद्रातून निधीबाबत पाठपुरावा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करीता लढा उभारला व मंत्री महोदय तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रयत्न केले ज्याची परीणीती परभणी येथे शासकीय महाविद्यालय शासनाने गतवर्षी सुरु केले. अल्पसंख्याक समुदाया करीता काद्राबाद प्लॉट एरिया मध्ये व इतर प्रभागात विकास कामे केली ज्यातुन परभणीकरांना भौतिक सुविधा मिळत आहेत.



