मराठवाडा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी कडून स्वागत व सकारात्मक चर्चा

परभणी – बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रकाशजी आंबेडकर हे काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी परभणी आले असता सावली विश्राम गृह येथे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले व काँग्रेस प्रवक्ते सुहास पंडित यांनी सकारात्मक चर्चा करत आगामी काळात केंद्रातील व राज्यातील भाजपा हुकुमशाही सरकारला हटवण्यासाठी इंडिया आघाडी व राज्यातील महविकास आघाडी मध्ये वंचित बहुजन आघाडी ने सामील व्हावे अशी विनंती केली आणि केंद्रातील हुकमाशही सरकारला हटवण्याकरिता काँग्रेस पक्ष हि वंचित आघाडी सोबत सर्व ताकतीने सोबत राहील अशी चर्चा करण्यात आली व प्रकाशजी आंबेडकरजी यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद हि भेटला. याप्रसंगी सुहास पंडित, पवन निकम , नागसेन भेरजे , विशाल बुधवंत,सिद्धार्थ लोणकर, रोहीत घोडके, इर्शाद पाशा, अंगद सोगे, सत्तार पटेल, गंगाधर गायकवाड ,पैठणे, राजेश रेंगे, विनोद तूपसमुंद्रे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते



