क्राईम

नांदेड शहरात दोन ठिकाणी पॉपीस्ट्रॉ पावडरची विक्री करणारे आरोपीविरुध्द NDPS कायद्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडुन कार्यवाही

 

आगामी लोकसभा निवडणुक-2024 अनुषंगाने मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक व बाळगणारे आरोपीतांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांनी स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांना सुचना दिल्या होत्या.

दिनांक 31/03/2024 रोजी नगीनाघाट ते बंदाघाट रोडवर एक इसम त्याचे ताब्यात पॉपीस्ट्रॉ पावडर विक्री करत असल्याची गुप्त बातमीदारा कडुन स्थानीक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अमलदार यांना माहीती मिळाल्यावरुन पो. नि. श्री उदय खंडेराय, स्थागुशा नांदेड यांनी सदर माहीती मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जावुन छापा मारला असता, इसम नामे सुरजसिंह पिता कल्याणसिंह ठाकुर वय 50 वर्ष व्यवसाय मजुरी रा. चिरागगल्ली, इतवारा, नांदेड ता. जि. नांदेड हा मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण वजन 2 किलो 285 ग्राम वजनाचे (POPPY STRAW) पावडर ज्याची एकुण किंमत रु. 11,425/- चा माल जप्त करुन नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे वजीराबाद येथे गुरनं. 156/2024 कलम 8, 17, 20, 22 एन. डी. पी. एस. अॅक्ट 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील इतर दोन फरार आरोपीतांचा शोध घेणे चालु आहे.

तसेच दिनांक 01/04/2024 रोजी पो. नि. श्री उदय खंडेराय, स्थागुशा नांदेड यांना गुप्त बातमी दारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाल्यावरुन, तानाजी नगर, नांदेड येथे एक इसम पॉपीस्ट्रॉ बोंडाचे तुकडे विक्री करीत आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी सदर माहीती मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी राजपत्रीत अधिकारी श्री शैलेस दिगांबरराव फडसे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्धापुर यांचेसह जावुन इसम नामे मितसिंघ राजासिंघ मास्तर वय 45 वर्ष व्यवसाय मजुरी रा. नंदीग्राम सोसायटी, पाण्याचे टाकीजवळ, नांदेड ता. जि. नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण वजन 13 किलो 535 ग्राम वजनाचे (POPPY STRAW चे बोंडाचे तुकडे एकुण किंमत रु. 67,675/- चा माल जप्त करण्यात आला आहे. पो नि श्री उदय खंडेराय यांचे फिर्यादीवरुन नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे..

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाशकुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, पोउपनि/दत्तात्रय काळे, सहापोउपनि/माधव केंद्रे, पोहेकों/बालाजी तेलंग, पोना/ विठ्ठल शेळके, किशन मुळे, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी यादगीरवाड, रणधीर राजबन्सी, धम्मा जाधव, राजु पुलेवार, किरण बाबर, चालक पोहेकॉ दादाराव श्रिरामे, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *