नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक गावठी पिस्टल व आकरा मोबाईलसह तीन आरोपीना घेतले ताब्यात

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हद्दित अवैध गावठी पिस्टल बाळगणारे आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन अटक करण्यासाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी योग्यत्या सुचना देवुन कार्यवाही करण्याबाबत आदेश दिला असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक एन.एस.आयलाने, याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश अशोकराव कोरे, पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, प्रभाकर मलदोडे, संतोष जाधव, विक्रम वाकडे, शेख सत्तार मगदुम, मारोती पचलिंग, माधव माने, शिवानंद पंडीतराव तेजबंद, शंकर रेवन माळगे,
मंगेश दिगांबर पालेपवाड, यांना दिनांक 31/03/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वाजेगांव बायपास रोडवरील ब्रिजखाली वाजेगांव शिवार ता.जि. नांदेड येथे जावुन छापा मारला असता तेथे खालील इसम संशईतरित्या मिळुन आले. 1) आमेरखान महेफुजखान वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा.एक्बालनगर, गाडेगांवरोड, नांदेड, 2) आदेश गौतम कांबळे वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. रहिमपुर, दुधडेरी, नांदेड, 3) सय्यद फेरोज सय्यद मुजीब वय 23 वर्ष व्यवसाय मजुरी रा. मिल्लतनगर, गाडेगांवरोड, नांदेड यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्याचेकडे खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.



