क्राईम

12 वर्षीय मुलीचा एका नराधमाने केला विनयभंग

गुन्हा दाखल करताच अवघ्या एका तासात आरोपी गजाआड, धर्माबाद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

 

अनंतोजी कालिदास
धर्माबाद -धर्माबाद तालुक्यातील एका गावामध्ये बारा वर्षीय मुलीवर एका नराधामाने विनयभंग केल्याची घटना घडली होती, सदर घटनेबाबत पिडीतेच्या आईने धर्माबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करताच अवघ्या एका तासाच्या आत धर्माबाद पोलिसांनी सदरचा आरोपी म्हैसा येथून आणत अटक केली आहेत.

याबाबत सविस्तर वृतांत असे की दि. 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:50 च्या सुमारास धर्माबाद तालुक्यातील एका गावामध्ये 12 वर्षीय चिमुकली ही खेळत असताना आरोपीने स्वतःजवळ बोलवून तिला गच्च धरून विनयभंग केला होता, सदरची घटना ही त्या चिमुकलीने आपल्या आईला सांगितले असता तिच्या आईने सरळ धर्माबाद पोलीस स्टेशन येथे येत पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना घडलेला वृत्तांत सांगत न्याय देण्याची विनंती केली होती, घडलेली घटनेचे गांभीर्य ओळखून लगेचच पोलीस निरीक्षक यांनी माननीय पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सूत्रे हलवत आरोपीचा भ्रमणध्वनी नंबर नेमका कुठे चालू आहे का? याची चाचपणी केली होती, त्यानुसार त्याचा भ्रमनध्वनी नंबर हा भैसा येथे कार्यरत असल्याचे पाहून त्वरित कारवाई करत भैसा येथे पथक रवाना करत आरोपीची धरपकड केली होती, गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासाच्या आत आरोपी हा गजाआड करण्यात केले होते.

12 वर्षीय पिडीतेच्या 39 वर्षीय आईने दिलेल्या तक्रारीनुसार धर्माबाद पोलीस स्टेशन येथे गुरन नंबर 335/24 कलम 74 बिएनएस, 8,12, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे नोंद करत आरोपीस गजाआड करत दि. 6 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करत आरोपीस न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपीस न्यायलयिन कोठडी सुनावण्यात आली असता त्यास नांदेड येथील जेलमध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने प्राप्त झाली आहे, सदरची कार्यवाही ही पोनि रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पवार मॅडम यांच्या कृतीशील अंमलबजावणी खाली पोलीस हवालदार कुमरे व सचिन गडपवार यांनी पार पाडली असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *