शिक्षण

देगलूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सव सोहळा ‘जश्न ए उर्दू’ म्हणून साजरा केला जाणार

 

16 ते 18 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचा अयोजन विविध राजकीय, सामाजिक व धार्मीक व्यक्तीची उपस्थिती लाभणार

देगलूर, ( ) देगलूर शहरातील सुप्रसिध्द शैक्षणिक संस्था (मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू एज्युकेशन सोसायटी स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झालेल्या निमित्याने संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात सुवर्ण महोत्सव सोहळा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री अलहाज शेख मोहम्मद सहाब यांनी पत्रकाव्दारे दिली.

या सुवर्णमहोत्सव सोहळाच्या सुरुवात 16 डिसेंबर ला ‘उर्दू रॅली’ काढून होणार आहे. उर्दू ही रैली मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल व ज्यु. कॉलेज, मुख्य इमारत अहेमद अली कॉलनी नरंगल रोड येथून निघून शहराच्या विविध मार्गाने पुन्हा शाळेच्या मुख्य इमारतीत येईल. त्याच दिवशी दुपारी संस्थेतील विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर

17 डिसेंबर ला ‘जश्न उर्दू’ चा आयोजन केला जाईल. ज्यात उर्दू भाषा व साहित्य संदर्भात विविध कार्यक्रमाव्दारे देखावे व उपक्रम सादर केले जाईल.

18 डिसेंबर रोजी संस्थेच्या वतीने माजी व होतकरु व कर्तबागार विद्यार्थ्यांना गौरविण्यात येईल. जे समाजात उल्लखणिय पदावर कार्यरत आहेत. याच दिवशी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री मा. खा. रविंद्र वसंतराव चव्हाण (लोकसभा सदस्य, नांदेड) व मौलाना मुफ्ती जैनुल आबेदीन (सचिव, संस्था निरल महाराष्ट्रा) उपस्थितीत राहणार आहेत.

या तिन दिवसीय सुवर्ण महोत्सव सोहळ्यात मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू एज्युकेशन सोसायटी, देगलूर च्या सर्व जवाबदार पदाधिकारी च्या व्यतिरीक्त सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची तयारी केली आहे. या शैक्षणिक संस्थेच्या विद्याथी व विद्यार्थीनी सुवर्ण महोत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रम सादर करणार आहेत. देगूलर हा महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाना या तिन राज्याच्या सिमेवर बसलेला महत्वपुर्ण शहर आहे. येथे उर्दू भाषेचे ज्ञान असणारे अनेक लोक राहतात. गेल्या 50 वर्षांपासून ही शैक्षणिक संस्था आपली शैक्षणिक सेवा प्रदान करीत आहे. या शैक्षणिक संस्थेतून गेल्या पन्नास वर्षात अनेक शिक्षक/शिक्षीका / प्राध्यापक/अधिव्यक्यता/ डॉक्टर/ इंजिनिअर / वकिल / पोलीस ऑफीसर / उदयोगपती म्हणून आपली सेवा समाजाला देत आहे.

या तिन दिवसीय सुवर्ण महोत्सव सोहळ्यात सर्व उर्दू प्रेमी व उर्दू जानकार सहीत सर्व लोकांना संस्थेच्या वतीने आमंत्रित करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *