नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी, व पोलीस अंमलदार सेवानिवृत्त…

नांदेड पोलीस दलातील एक सपोनि, तिन पोउपनि, चार ग्रेड पोलीस उप-निरीक्षक, तिन सपोउपनि, एक पोहेकों, एक पोकॉ असे एकुण तेरा पोलीस अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार दिनांक 31.12.2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना आज मंगळवार निरोप देण्यात आला. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे हस्ते आज सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. या प्रसंग मा. अपर पोलीस अधीक्षक साहेबांनी तुम्हाला जे पेंशनचे पैसे मिळतात त्याचे योग्य नियोजन लावुन ठेवावे.
आणि चांगल्या कामासाठी वापर करावा असा सल्ला दिला. तसेच सर्व सेवानिवृतानी आपल्या कुटूंबाकडे वेळ द्यावा आणि आरोग्यांची काळजी घेवुन सुखी आणि आनंदी जिवन जगण्याचा सल्ला दिला. सदर कार्यक्रम मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे पार पडला. सदर कार्यक्रमास मा. श्री नामदेव रिट्टे, पोनि कल्याण, इतर पोलीस अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. श्री नामदेव रिट्ठे, यांनी केले असुन, मपोकों सविता भिमलवाड, पोलीस कल्याण यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे केले आहे.
सेविनिवृत्त पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदाराचे नाव
बळवत जमादार श.वा.शा. वजिराबाद, बळीराम राठोड नियंत्रण कक्ष, चाँद ईब्राहीम सैय्यद पोस्टे मुक्रमाबाद, लहु रामजी घुगे पोस्टे नियंत्रण कक्ष, दत्ता हासेप्पा काईतवाड पोलीस मुख्यालय नांदेड, गोरख रघुनाथ भोसीकर पोस्टे विमानतळ, अंकुश रामजी घुगे नियंत्रण कक्ष, अनिल बलप्पा श्रीवास्तव श.वा.शा. कृष्णा नागनाथ जायेवार पोलीस मुख्यालय, नांदेड, अब्दुल कादर अब्दुल करीम पोस्टे कंधार, नागोराव संभाजी लोखंडे गुरुव्दारा सुरक्षा पथक, उत्तम माणिकराव निरडे पोलीस मुख्यालय नांदेड, बळवंत अण्णाराव बिरादार पोस्टे मुक्रमाबाद



