नांदेड पोस्ट ऑफिस मधून पासपोर्ट काढताना नागरिकांना वेठीस धरल्या जात आहे

नांदेड दि.8 एप्रिल 2018 मध्ये नांदेड मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिस पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. गेल्या 06 वर्षात सुमारे 50 हजार नागरिकांनी या ठिकाणाचा लाभ घेऊन त्यांचे पासपोर्ट बनवले आहेत. पासपोर्ट कायद्यानुसार भारतीय नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा आणि रहिवासी पुरावा कागदपत्र आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या चौकशीनंतर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांशिवाय आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पारपत्र दिले जात होते.
परंतु मागील काही दिवसापासून नांदेड येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सुविधा केंद्रात अर्जदारांची जन्मतारीख व वास्तव्य पुरावा देऊनही नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. नवीन पारपत्र साठी जन्मतारीख व वास्तव्य असे दोन पुरावे आवश्यक असल्याचे पारपत्र सुविधा संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे असे असूनही नांदेड मधील पोस्ट ऑफिस पारपत्र कार्यालयात नागरिकां ना विनाकारण निवडणूक ओळखपत्र व इतर कागदपत्रे मागतली जात आहेत.
आणि विनाकारण नागरिकांना पारपत्र मिळवण्यापासून दूर ठेवले जात आहे अनेक वेळा नागरिकांना अवाजवी कागदपत्रांसाठी वेठीस धरले जात आहे त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारी असुविधा दूर करावी अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्तजीबुद्दीन मुनीरुद्दीन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री यश जय शंकर यांना पाठवले आहे आणि याच्या प्रती संबंधित कार्यालयाला सुद्धा देण्यात आल्या आहेत.



