जिला

मानसिक व शाररिक सदृढ युवक यशस्वी उद्योजक होतो- जी.आर.उघडे

 

पाटोदा दि. १२ मानसिक व शाररिक दृष्ट्या सदृढ असलेला युवक हा यशस्वी उद्योजक होतो.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जी.आर.उघडे यांनी केले. ते समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षक संस्थे द्वारे आयोजित उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करावा असे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने प्राचार्य एस.एस. परघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा येथील समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय जोगी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन व्याहाळकर यांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी गटनिदेशक विजय कांबळे यांनी केले.पुढे बोलताना जी.आर.उघडे म्हणाले की, सशक्त समाज घडवण्यासाठी निरोगी युवकांची आवश्यकता असते आणि असे निरोगी युवक घडवण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर मातांनी आपल्या मुलांना घडवत असताना राजमाता मांसाहेब जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असे प्रतिपादन उघडे यांनी केले.सचिन व्यहाळकर यांनी ही आपले विचार व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप अजय जोगी यांनी केला यावेळी प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी साहेब सोरटे, धर्मसिंग राठोड आणि स्नेहल वेनकरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

 

स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच युवा दिनाचे औचित्य साधून सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर उद्योजक होण्यासाठी त्यांना सर्वोपरी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिपिक एस. एस.राऊत यांनी केले तर आभार निदेशक वैशाली खोकले यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी प्रभारी गटनिदेशक विजय कांबळे,लक्ष्मण कुंमरे, परमेश्वर भुरके,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आणि शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *