शिक्षण
क्रांतिवीर समशेर सिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम

पाटोदा दि. 10 येथील क्रांतीवीर समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या निर्देशानुसार 12 जानेवारी 2025 रोजी ‘उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.डॉ.आनंद भालेराव यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. साहेबराव पवार, श्री जी आर उघडे,श्री.रामलू नरसय्या कोतूरवार,श्री.एस. एस.आडे उपस्थित राहणार आहे. या उद्योजकता कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य एस.एस. परघणे, शिल्प निदेशक विजय कांबळे आणि क्रांतिवीर समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या निदेशक व कर्मचारी वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.



