जिला

आईप्रमाणे सर्व जीवसत्वांवर प्रेम करावे – पू. भिक्खु अतुरलिय रतन थेरो

महाविहार बावरीनगर येथे ३८ व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेचे उत्साहात सुरुवात

 

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे / बावरीनगर दाभड नांदेड येथे पौष पौर्णिमेला आयोजित ३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील विद्यमान खासदार पू. भिक्खु अतुरलिय रतन थेरो यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटकीय धम्म देसनेत ते म्हणले की मनुष्याने सर्व जीवसत्वांवर आईप्रमाणे प्रेम करावे जेणेकरून आपल्या मनामध्ये प्रत्येक जीवाविषयी करून निर्माण होईल, प्रेम, आपुलकी निर्माण होईल व माणसामाणसातील, राष्ट्रा- राष्ट्रातील वैर आपोआपच संपुष्टात येईल व सर्वत्र प्रेम भावना –बांधिलकी वाढीस लागेल.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ‘भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा’ चे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न होत आहे. आदरणीय महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड हे या परिषदेचे मुख्य संयोजक आहेत.

बौद्ध धम्माच्या सखोल शिकवणींचा उत्सव साजरा करण्यासाठी ही बौद्ध धम्म परिषद, वैचारिक प्रबोधन, आंतरिक शांती आणि सांप्रदायिक सौहार्द वाढवणेसाठी समर्पित आहे. परिषदेच्या निमित्ताने बावरीनगर परिसरात उभारण्यात आलेला विशाल मंडप, पू. भिक्खु संघाच्या निवासाकरिता नव्यानेच निर्माण करण्यात आलेले भिक्खु निवास, परिसरातील इमारतींवर करण्यात आलेली विद्युत रोशनाई, अशातच निर्मिलेला ८४ फुट उंचीचा ध्वज स्तंभ, सर्वत्र करण्यात आलेली चैतन्यपूर्ण सजावट आणि दोलायमान बौद्ध प्रतीकांनी सुशोभित केलेला बावरीनगरचा परिसर, ज्यामुळे अमूल्य बुद्ध वाणीचे श्रवण करीत आत्मनिरीक्षण आणि आत्म-चिंतनास अनुकूल वातावरण निर्मिती झालेली पाहावयास मिळाली.

या दोन दिवसीय परिषदेत समाजसेवा आणि समाजकल्याणावरही जोर देण्यात येत असतो. विविध सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक गरजूंना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. मोफत वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले, ज्याचा उपस्थित उपासक उपसिकांना लाभ घेत आहेत.
या परिषदेत धम्म ध्वजारोहन श्रीलंका येथील मा. खासदार पू. भिक्खु अतुरलिय रतन थेरो यांचे हस्ते झाले सकाळी ठीक ९.३० वाजता झाले.

संध्याकाळी ६:०० वाजता थायलँड हून आणलेल्या धातूच्या बुद्ध मूर्तीच्या प्रतिस्थापनेचा समारंभ देखील पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. ३८ व्या धम्म परिषदेनिमित्त काढण्यात येणार्या् ‘संबोधी २०२५’ चे प्रकाशन अखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे हस्ते पार पडले. परिषदेच्या उद्घाटकीय समारंभात प्रास्ताविकामध्ये डॉ. मिलिंद वि. भालेराव यांनी धम्म परिषदेच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. रात्री उशिरापर्यंत देश विदेशातील विद्वान भिक्खून्द्वारा धम्म देसना सुरू होती.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी भिक्खू अश्वजित थेरो, भिक्खू बुद्धभूषण यांचेसह एंजि. डी डी भालेराव, प्रा बी एम वाघमारे,पत्रकार उध्दव सरोदे ,ईश्वर सावंत, डी पी गायकवाड, अशोक गोडबोले, एस टी पंडित, गंगाधर सूर्यवंशी, आदि परिश्रम घेत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *