जिला

भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर शहर अध्यक्षपदी दामोधर सरकटे, उपाध्यक्षपदी जनार्दन जमदाडे तर सरचिटणीसपदी रमेश कोकरे यांची निवड

 

नांदेड :- उध्दव सरोदे / सहयोगनगर येथील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार,नांदेड येथे दि.10 जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय बौद्ध महासभेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा शाखा पदाधिकारी व शहर शाखा उत्तर कार्यकारिणीचे पुनर्गठण बैठक शहराध्यक्ष हंसराज वन्ने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नांदेड उत्तर शहर शाखा कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली. नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.

अध्यक्षपदी दामोधर सरकटे, उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) जनार्दन जमदाडे, सरचिटणीस रमेश कोकरे, उपाध्यक्ष (संस्कार) चंद्रकांत घोडगे, उपाध्यक्ष (संरक्षण) सदाशिव हनुमंते, कोषाध्यक्ष रामराव कदम, कार्यालयीन सचिव प्रा. एस. डी. बडेराव, हिशोब तपासणीस यशवंत ढगे, सचिव संस्कार भीमराव कदम, सचिव संस्कार निवृत्ती लोणे, सचिव (प्रचार व प्रसार) दिगंबर ढगे, सचिव (प्रचार व पर्यटन) पंकज जोंधळे, सचिव (संरक्षण) आनंद जोंधळे, विजय पोपलवार, संघटक प्रकाश जोंधळे, केशव वाघमारे, अशोक कदम, सिद्धार्थ जोंधळे, श्रावण मेथेकर, मारोती कांबळे आदींची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष डॉ. यशवंतराव चावरे, जिल्हा सरचिटणीस रविकिरण जोंधळे, जिल्हा कोषाध्यक्ष सा. ना. भालेराव, जिल्हा प.सचिव तथा पत्रकार उध्दव सरोदे,कार्यालयीन सचिव सुरेश लोकडे, राजेश बिर्‍हाडे, हंसराज वन्ने यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *