शिक्षण

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून शैक्षणिक सहलीचे आयोजन पुण्याकडे रवाना झाले 75 विद्यार्थी

 

नांदेड, 21- राष्ट्रीय अविष्कार योजने अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नांदेडच्यावतीने विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, एनएमएमएस, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळवलेल्या 75 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सहलीस आज मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शुभेच्छा देत सहल रवाना केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सहलीचा आनंद घेत शिक्षणाचा नवा अनुभव घेण्याचा संदेश दिला. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. तसेच अशा शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात कसा होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले.

सहलीचे नियोजन श्री समर्थ हॉलिडेचे अजयकुमार शहाणे, युवराज व वैभव यांनी केले असून या सहलीत पिंपरीचा सायन्स पार्क, ऐतिहासिक शनिवारवाडा, लाल महाल यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी प्रविणा मांदाळे, बाबुराव जाधव, संजय भालके, सुवर्णा बामनपल्ले, आशालता स्वामी, संजय गुजरवाड, आकाश गाडगेराव, प्रविण सूर्यवंशी व संतोष पांचाळ यांनी घेतली आहे.

विद्यार्थ्यांना दररोजच्या सहलीची दैनंदिनी लिहून निबंधवजा अहवाल तयार करण्याचे मार्गदर्शनही देण्यात आले आहे. ही सहल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *