मराठवाडा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काँग्रेसचे उद्या आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र_पाटील_चव्हाण, नेतृत्वाखाली मा आ हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मा आ ईश्वरराव भोसीकर, मा आ माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत

“राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त” निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कृत्याविरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी उद्या दि. २५-०१-२०२५ रोजी दुपारी 12 वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोर, आय.टी.आय. चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आज जिल्हा व शहर काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष बि.आर कदम शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके, राजेश पावडे ,अनिल मोरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आली व नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची आंदोलनाच्या परवानगीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केदार पाटील साळुंके,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश पावडे, नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल सावंत, नांदेड जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश देशमुख, बालाजी चव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठलराव पावडे, सत्यपाल सावंत, विश्वास कदम, शंकर पा. शिंदे, बापूसाहेब पाटील, माधव पा. पवळे, गणेश पा. ढगे, धनंजय उमरीकर, माणिक देशमुख, गणेश पा कोकाटे,गोविंद पाटील सह आदींनी भेट घेऊन आंदोलनाची परवानगी घेतली.

उद्या दि. २५-०१-२०२५ रोजी दुपारी 12 वाजता नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार, माजी जिल्हा परिषदचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरपालिकेचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, सह प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सर्व सेलचे प्रदेश पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते सह समस्त काँग्रेस प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *