पहेलवान सय्यद शोएब यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड

नांदेड दि. 24 समर्थ व्यायाम शाळा नवाघाट या ठिकाणी अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीत नांदेड येथील प्रसिद्ध मल्ल सय्यद शोएब सय्यद नूर यांनी चमकदार कामगिरी करून 92 किलो वजनी गटात नांदेड मधून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
त्यांना पहिलवानकीचे धडे त्यांचे वस्ताद स. जगतसिंग गाडीवाले, अब्दुल बारी वस्ताद, तीप्पासिंग उस्ताद, बालू यादव उस्ताद, अहमद उस्ताद आणि त्यांचे वडील सय्यद नूर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. सय्यद शोएब यांनी या अगोदरही तीन वेळा विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि 29 जानेवारी ला अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.



