शिक्षण

स्वामीत्व योजनेच्या मालमत्ता पत्रक वितरण कार्यक्रम संपन्न

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे / शहरातील पंचायत समिती अर्धापूर येथे मा.गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीत्व योजनेचे मालमत्ता पत्रक वितरणा बाबत तालुक्यातील मा.सरपंच , उप सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक,आपले सेवा सरकार केंद्र चालक व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आदि या कार्यशाळेला उपस्थित होते.या कार्यशाळेचे भूमी अभिलेख अर्धापूर चे लक्ष्मण सरोदे यांनी सविस्तर स्वामीत्व योजनेचे फायदे व स्वामित्व योजने विषयी मार्गदर्शन केले तसेच विस्तार अधिकारी पंचायत श्री.मुंडकर यांनी कार्यशाळेला सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत स्वच्छता विषयक शपथ,नशा मुक्त शपथ घेण्यात आली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींचे आँनलाईन थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.या कार्यशाळेचे सुतारे राजेश,विजय निकम क.सा. यानी नियोजन चांगल्या प्रकारे करून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम पंचायत अधिकारी शिवकुमार देशमुख यांनी करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *