शिक्षण

नांदेड विभागात ‘स्वच्छता ही सेवा 2026 ’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदर्शन, चित्रकला-सुविचार-निबंध स्पर्धा आणि पूर्णा स्थानकावर पथनाट्य

 

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेऊन विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

 

केंद्रीय विद्यालय, नांदेड येथील विद्यार्थ्यांसाठी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील IOH शेडमध्ये ज्ञानदर्शन दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (STP) तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, प्रक्रिया, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

Oplus_16908288

तसेच केंद्रीय विद्यालय, नांदेड येथील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छता ही सेवा’ या विषयावर चित्रकला, घोषवाक्य लेखन आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, स्वच्छ परिसर, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांची जबाबदारी याविषयी आपल्या कल्पना सर्जनशील पद्धतीने मांडल्या.

 

दरम्यान, पूर्णा रेल्वे स्थानकावर स्काऊट्स अँड गाईड्सच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. पथनाट्याच्या माध्यमातून प्रवासी व नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात कचरा न टाकणे, उपलब्ध कचरापेटीचा वापर करणे आणि स्वच्छता राखणे याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.

 

या उपक्रमांचा उद्देश विद्यार्थी व युवकांना स्वच्छता अभियानाशी जोडणे आणि त्यांच्यामार्फत समाजामध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवणे हा आहे.

 

नांदेड विभागातर्फे सर्व प्रवासी व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, कचरा निर्धारित कचरापेटीतच टाकावा आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *