मासेमारी करणाऱ्या पित्याच्या घरी लेकीने लावला वैद्यकीय ज्ञानाचा दिवा

नांदेड/प्रतिनिधी.. खडकपूरा ,भोई गल्ली येथे राहणाऱ्या भोई समाजाच्या मासेमारी करणाऱ्या माणिक पंदीलवाड यांच्या कु. आकांक्षा माणिक पंदीलवाड या मुलीने बीएएमएस वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून एक प्रकारे वडिलांच्या घरी वैद्यकीय दिवा लावल्याचे कुतहळ सर्व स्तरातून होत आहे. अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था नांदेड शाखेच्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष डी.के. तोकलवाड, उपाध्यक्ष व्यंकटराव नागलवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.पी.वन्नलवाड, आधी पदाधिकाऱ्यांनी आकांक्षा व तिच्या आई-वडील व आजीं आजोबांचा सत्कार करून आकांक्षाला भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कोणतीही शिकवणी नसताना केवळ घरी अभ्यास करून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश पात्र ठरलेल्या आकांक्षांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे आयोजित कार्यक्रमास सतीश बट्टेवाड एन.एस. संभाजीराव डुबुकवाड, दिलीपराव पंदलवाड, गजानन टोकलवाड, घंटलवाड के.के,गलपवाड पी.एम. बालाजीराव डुबुकवाड, व्यंकटराव निलेवाड, तुकाराम निलेवाड, व्यंकटराव जेलेवाड, सचिन निलेवाड, हरीश बटनवाड रामजी बोरीकर, पिंटू बोरीकर, माणिकराव बोरीकर, धावरीकर मामा, संभाजी पंदलवाड, बालाजीराव वाखरडकर, गोपीनाथ डुबुकवाड, यांच्यासह भोई समाजातील बहुसंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



