मराठवाडा
मतदारांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी आंदोलन

परभणी प्रतिनिधी / राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने जनजागृती आंदोलन करण्यात आले. आंदोलनात निवडणूक आयोगाच्या अन्यायकारक निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आणि लोकशाही

टिकवून ठेवण्यासाठी तसेच मतदारांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी आंदोलन करून उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांना याविषयी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नदीम इनामदार शहर अध्यक्ष, मा.खा. तुकाराम रेंगे पाटील, बाळासाहेब देशमुख,
भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे, इरफान उर रहमान, युवा नेते अब्दुल सईद , अतिख उर रहमान, विशाल बुधवंत, बाळासाहेब फुलारी, मोईन मौली, नागनाथ काकडे, शेख खाजा, सुहास पंडित, खदीर लाला हाश्मी, सत्तार पटेल, मतीन शेख, दिगंबर खरवडे, सचिन जवंजाळ, वैजनाथ देवकते,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



