हेल्थ
प्रजासत्ताक दिन निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तंबाखू मुक्ती शपथ व कुष्ठरोग मुक्त भारत ची प्रतिज्ञा

भोकर :- भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर कडून ध्वजारोहन वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ व कुष्ठरोग मुक्त भारतची प्रतिज्ञा यांचे वाचन आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले. सर्वांनी शपथ व प्रतिज्ञा घेतली.
यावेळी डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष अंगरवार, डॉ नितीन कळसकर, डॉ अस्मिता भालके, डॉ मंगेश पवळे, डॉ सागर रेड्डी, डॉ मायादेवी नरवाडे ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



