मराठवाडा
प्रजासत्ताक दिनानिमित्त सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीने मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न

नांदेड : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीच्या सकाळी सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीने मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे सुमारे २००० विद्यार्थी व नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवानी यांच्या मार्गदर्शनाखाली दाईम कुरेशी, हरीश काळे, लखन वापरानी, गणेश चंदोलकर, प्रसाद सिधनाथ आणि शुभम बोराटे यांनी विशेष मेहनत घेतली.
सामाजिक एकता व आनंदाचा संदेश देण्यासाठी सप्तरंग सेवाभावी संस्थेने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.



