जिला

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील विजेत्या ग्राम पंचायतींचा सन्मान

पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्‍या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव

 

नांदेड, 26: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विजेत्या ग्राम पंचायतींचा सन्मान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित पोलिस मुख्यालयावरील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात या विजेत्या ग्राम पंचायतींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला.

कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर तसेच जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सन 2023-24 या वर्षासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियानातंर्गत जिल्‍हास्‍तरीय तपासणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम विजेत्या ग्राम पंचायतींमध्ये नागापूर (ता. भोकर) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. जवळगाव (ता. हिमायतनगर) ग्रामपंचायतीने व्दितीय क्रमांक, तर चिचोंली प.क. (ता. कंधार) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांचा पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी ग्रामपंचायतींनी राबवलेल्‍या स्वच्छता उपक्रमांचे कौतुक केले.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *