महाराष्ट्रा

दुचाकीवर मागच्या सिटवर बसलेला हा माणूस कोण, ओळखता का?


नांदेडचे जिल्हाधिकारी!
होय… जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आहेत.
एसी ऑफिसमध्ये बसून दुष्काळाची आकडेवारी पाहणारे नाही, तर शेताच्या बांधावर उतरून दुष्काळाचे वास्तव तपासणारे जिल्हाधिकारी!
हे दृश्य पाहूनही विश्वास बसत नसेल, तर एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला विचारा..
दुचाकीवर मागे बसलेली ही व्यक्ती कोण आहे, बोटावर मोजता येतील एवढेच लोक त्यांना ओळखतील. मी जर सांगितले की, या मोटारसायकलवर मागे बसलेली व्यक्ती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले साहेब आहेत, तर अनेकांना माझ्यावरही विश्वास बसणार नाही.

तुम्ही म्हणालं “जिल्हाधिकारी असे थोडेच फिरतात? तेही दुष्काळाची पाहणी करण्यासाठी? आणि कुणाच्या तरी मोटारसायकलवर मागे बसून?” असा प्रश्न तुम्हाला स्वाभाविकपणे पडेल.
पण मित्रांनो, हे वास्तव आहे!
दुष्काळाचे कागदावरील आकडे आणि प्रत्यक्ष शेतातील दुष्काळ यामध्ये किती मोठे अंतर असते, हे समजून घेण्यासाठी राहुल कर्डीले साहेब एखाद्या शोधपत्रकाराप्रमाणे नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत.
रस्त्याने जाताना एखादे शेत दिसले की मोटारसायकल थांबवायची… थेट शेतात जायचे… पिकाला हात लावायचा आणि शेतकऱ्याची परिस्थिती समजून घ्यायची!
सोयाबीन असो, ऊस असो, हळद असो किंवा कापूस—प्रत्येक पिकाची ते बारकाईने पाहणी करत आहेत.

सोयाबीनच्या झाडाला किती शेंगा आहेत?
किती शेंगा भरलेल्या आहेत?
किती पापड्या आहेत?
किती शेंगांमध्ये बारीक दाणे आहेत?
पिकाची प्रत्यक्ष अवस्था काय आहे?
हे केवळ कर्मचाऱ्यांच्या अहवालावर विश्वास ठेवून नव्हे, तर स्वतः शेतात उतरून, स्वतः शेंगा तोडून पाहत आहेत.
विहिरीची पाणीपातळी किती आहे? पाण्याची परिस्थिती काय आहे? याचीही ते प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.
हा अधिकारी दुष्काळ फक्त फाईलमध्ये पाहत नाही… तो दुष्काळ शेतात उतरून अनुभवत आहे!
मागच्या वर्षीही राहुल कर्डीले यांनी सोयाबीन पिकाचे कापणी प्रयोग प्रत्यक्ष घेतले. उत्पादनाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर करून अचूक आणेवारी काढण्यावर भर दिला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि पिकविमा नुकसानभरपाई मिळण्यास मदत झाली.

नांदेड जिल्ह्य़ात शेतकऱ्यासाठी पुढाकार घेणारे काही शेतकरी नेते डॉ. भगवानराव मनूरकर, हणुमंत राजेगोरे, संदीप देशमुख बारडकर आणि बालाजी हेंद्रे हे त्यांच्या कामाची आवर्जून दखल घेत आहेत.
आज दुष्काळाने शेतकरी चिंतेत आहे. पिकांचे भविष्य अनिश्चित आहे. पावसाने पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनातील एक मोठा अधिकारी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर येतो, त्याच्या पिकाला हात लावतो, विहिरीत डोकावतो आणि दुष्काळाचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतो…
यापेक्षा शेतकऱ्याला मोठा दिलासा कोणता?
दुष्काळात मदत करणारा, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणारा आणि न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः मैदानात उतरणारा अधिकारी आहे, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

अधिकारी अनेक असतात; पण अधिकारीपदाची खुर्ची सोडून शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचणारे अधिकारी विरळाच!
राहुल कर्डीले साहेबांची ही कार्यपद्धती निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा संवेदनशील, अभ्यासू आणि प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे.
प्रत्येक जिल्ह्याला राहुल कर्डीले यांच्यासारखा अधिकारी मिळाला, तर प्रशासन केवळ कागदावर चालणार नाही—ते माणसांच्या आयुष्यात उतरलेले दिसेल!
शेतकऱ्याच्या बांधावर उभा राहणारा अधिकारीच खऱ्या अर्थाने लोकांचा अधिकारी असतो.
राहुल कर्डीले साहेब, आपल्या या कामाला मनापासून सलाम!

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *