महाराष्ट्रा

जालना–छपरा–जालना विशेष गाडीच्या वेळापत्रकात सुधारणा

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत गाडी क्रमांक 07651/07652 जालना – छपरा – जालना टीओडी विशेष गाडी चालविण्याचे ठरविले अआहे, या गाडीच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 07651 जालना – छपरा विशेष गाडी ऑक्टोबर 2026 मध्ये प्रत्येक बुधवारी दिनांक 07, 14, 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी रात्री 23:35 वाजता जालना येथून सुटेल आणि शुक्रवारी सकाळी 09:35 वाजता छपरा येथे आगमन होईल. या गाडीच्या एकूण 4 फेऱ्या असतील.

गाडी क्रमांक 07652 छपरा – जालना विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी दिनांक 09, 16, 23 आणि 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 21:00 वाजता छपरा येथून सुटेल आणि रविवारी सकाळी 09:50 वाजता जालना येथे आगमन होईल. या गाडीच्या एकूण 4 फेऱ्या असतील.

हि विशेष गाडी दोन्ही दिशेने छत्रपती संभाजीनगर, नगरसूल, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, वाराणसी, जौनपूर जं, औंरीहार, गाझीपूर सिटी आणि बलिया स्थानकांवर थांबतील.

या विशेष गाडीमध्ये 2 एसी, 3 एसी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
प्रवाशांनी विशेष गाडीच्या सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *