नांदेड विभागात सघन तिकीट तपासणी मोहीम; 562 अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळली; 3.33 लाखांची वसुली

नांदेड विभागाकडून विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा यासाठी नियमितपणे सघन तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत.
या अंतर्गत , दिनांक 05.10.2026 रोजी 04:30 ते 19:00 वाजेपर्यंत सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सहभागाने सघन तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचे निरीक्षण श्री शैलेश कुमार सिंह, सहायक वाणिज्य अधिकारी /नांदेड यांनी केले. मोहिमेत एकूण 31 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून 23 गाड्यांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण 562 प्रकरणे आढळून आली असून 3,33,015/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
तपासणीचा तपशील
• विनातिकीट/अनधिकृत प्रवास (TWT): 281 प्रकरणे; भाडे: 1,10,745/-; दंड: ₹1,40,820/-
• अनियमित प्रवास (IRT): 54 प्रकरणे; भाडे: ₹13,230/-; दंड: 27,000/-
• अनबुक्ड लगेज (UBL): 227 प्रकरणे; रक्कम: 41,220/-
एकूण: 562 प्रकरणे | 3,33,015/- वसूल
रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना आवाहन करते की, प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट घ्यावे आणि संपूर्ण प्रवासादरम्यान आवश्यक प्रवास प्राधिकरण जवळ ठेवावे. नियमांनुसार आवश्यक असल्यास सामानाचेही योग्य प्रकारे बुकिंग करावे.
प्रवाशांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून रेल्वेच्या नियमांचे व सूचनांचे पालन करावे, जेणेकरून सर्वांसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत रेल्वे प्रवास सुनिश्चित करता येईल.



