शिक्षण

एज्युव्हीजन इंग्लिश स्कूल अर्धापूर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; पालकांचा भरघोस प्रतिसाद

नांदेडची आत्याबाई फेम कल्पनाताई खानसोळे यांची प्रमुख उपस्थिती

 

 

गुणवंत :- उध्दव सरोदे / अर्धापूर शहरातील एज्युव्हीजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला असून विविध गाण्यांवर नृत्य व नाटक सादर केली. गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती, धार्मिक गीत, देशभक्ती . स्त्री शक्ती समाजामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला. संचालक प्रविन रावते यांनी एजूव्हिजन इंग्लिश स्कूलचे प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन माँसाहेब जिजाऊ मंगल कार्यालय तामसा रोड, अर्धापूर येथे केले होते. कार्यक्रमांतर्गत विविध नाटकांचा, गाण्यांचा समावेश यात होता. प्रा प्रवीण रावते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळा स्थापनेचा उद्देश पालकांना समोर मांडला.

उच्च व दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचे ध्येय एज्यूव्हिजन चे आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात आराध्य दैवत गणपतीच्या गीताने झाले. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील जुन्या व नवीन गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करून उपस्थितांना मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे नांदेडच्या आत्त्या बाई कल्पनाताई खानसोळे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली व सर्व रसिक स्रोतांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या मागणीला प्रतिसाद देत त्यांनी स्टेजवर त्यांच्या शैलित संवाद साधला. लहान मुले जेव्हा आपण नृत्य सादरीकरण करताना पाहतो तेव्हा एक वेगळीच ऊर्जा आपल्यांना देऊन जातात असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मराज देशमुख हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार रेणुकादास देवणीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू क-हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरसेवक प्रवीण देशमुख, राजेश्वर शेटे, बाबुराव लंगडे, प्रल्हाद माटे, व्यंकटराव राऊत, पंडितराव लंगडे, डॉक्टर विशाल लंगडे, सोनाजी सरोदे, विराज देशमुख, अभिषेक गुरखेत, तुकाराम साखरे, नवनाथ बारसे, शिवराज जाधव, उद्धवराव राजेगोरे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत वीरकर, फिरदोस हुसेनी, आनंद शिनगारे, योगेश हाळदे, सचिन येवले, संदीप राऊत, लक्ष्मीकांत मुळे,

निळकंठ मदने, ओमप्रकाश पत्रे, नागोराव भांगे, सुभाष लोने, उदयकुमार गुंजकर, रामराव भालेराव, उध्दव सरोदे,मनोज मनपूर्वे, सचिन देशमुख, अँड गौरव सरोदे अनिकेत आवरदे यांच्यासह अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतीक चवरकर व शिक्षिका सौ छाया क्षीरसागर यांनी आपल्या मंजूळ वाणीतून केले. उपस्थितांचे आभार एज्युव्हीजन इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. प्रिया रावते यांनी मानते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक आशुतोष पुरी, सौ अंजली जडे, सौ स्वाती पांचाळ, सौ अलका धुमाळ, सौ पूजा घोलप, आरती गोमासे, श्रेया बनसोडे, सेविका मनीषा शिनगारे यांनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *