जिला

8 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे #किनवट येथे महाशिबीर

9 फेब्रुवारीला #भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फेब्रुवारी रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे #महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे.

समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 8 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11ः00 वाजता या महाशिबिराचे उदघाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड, अभिजीत राउत, जिल्हाधिकारी, नांदेड, श्रीमती दलजीत कौर जज, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले आहे. 9 फेब्रुवारीला भोकरी येथील न्यायालयाच्या विस्तरीत इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही कार्यक्रमाला न्यायमुर्ती शैलेश ब्रम्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *