हत्तीरोग दुरीकरण मोहीम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे प्रशिक्षण संपन्न

भोकर :- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम मा.डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा.डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, डॉ राजेश्वर माचेवार जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर शहरात दि.10 फेब्रुवारी ते दि 23 फेब्रुवारी 2025 या दरम्यान मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने आज दि. 6 फेब्रुवारी रोजी मा.डॉ प्रताप चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, मा.डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर, मोहन पेंढारे आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) भोकर, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक यांनी हत्तीरोग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, राम रतन नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थीनी, आपला दवाखाना व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील कर्मचारी यांचे हत्तीरोग दुरीकरण मोहीम बाबतचे सविस्तर प्रशिक्षण घेतले व माहिती दिली.
हत्तीरोग दुरीकरण औषध उपचार मोहीम अंतर्गत भोकर शहरात आपल्या घरी येणाऱ्या कर्मचारी यांच्या समक्ष डी.ई.सी व अल्बेडाँझोल गोळया ( 2 वर्षा खालील बालके, गरोदर माता व अति गंभीर आजारी यांना वगळून) वयोमानानुसार जेवण करुन समक्ष गोळ्या खा असे आवहान डॉ प्रताप चव्हाण, डॉ संदेश जाधव यांनी केले आहे.
यावेळी आरोग्य सेवक नामदेव कंधारे, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, आरोग्य सेविका मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, हत्तीरोग कर्मचारी विठ्ठल मोरे, संजय धुमाळे, गणेश गोदाम, रविंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर खोकले, राजू चव्हाण, आपला दवाखाना मयूर बोधगुले, गणपत पवार, अंगणवाडी सेविका अर्चना नरवाडे, तक्षीला हिरे, लक्ष्मी कौरवार, गंगुताई नर्तावार, जयश्री रेखावार, शकुंतला शिंदे, आशा वाघमारे, जयश्री गंगासागरे, अरुणा वैष्णव, दुर्गा जोशी, प्रणिता सोनकांबळे, राजश्री चालीकवार, कोशल्या बिजमवार, प्रभावती कवटीकवार, राम रतन नर्सिंग कॉलेज विद्यार्थीनी,आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील कर्मचारी उपस्थित होते.



