आजपासून १४ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद

किनवट,दि.७ : उद्या (ता.८)पासून दोन दिवसीय धम्म परिषदेला सुरुवात होत आहे
स्मृतिशेष उत्तमराव कांबळे नगरी, सावित्रीआई फुले चौक, बुध्दमुर्ती परिसर, समतानगर येथे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. मोहनराव मोरे,माजी नगराध्यक्ष, पुर्णा हे राहणार आहेत.निमंत्रक निखिल वाघमारे,संयोजक,अंकुश भालेराव व आयोजक राहूल कापसे हे आहेत.
शनिवार,( दि.८) दुपारी दोन वाजता उद्घाटन समारंभ होईल.अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, अध्यक्ष-दिक्षाभूमी, नागपूर हे असतील. उद्घाटकन भदंत अश्वजीत थेरो, सचिव, अ.भा. भिक्खू संघ, यवतमाळ हे करतील.स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. मोहन मोरे हे प्रमुख उपस्थितीतांचे स्वागत करतील.यावेळी भंते डॉ. आनंद, थायलंड, भंते सुदस्सन, भंते धम्मसार यांच्यासह दलितानंद खडसे, डॉ. माधयव मस्के, तेलंगणा, माधव कावळे, शंकर नगराळे, सुरेश जाधव, जनार्धन भवरे, शशिकांत लढे, महेंद्र नरवाडे, पुंडलीक मुनेश्वर, अनिल साळवे, डॉ. मनोज घडसिंग, अॅड. किशोर मुनेश्वर, अॅड. राहूल सोनकांबळे,अॅड. सुनील येरेकार, अॅड. यशवंत गजभारे, अॅड. सचिन दारवंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
सूत्रसंचालन चंद्रभीम हौजेकर हे,तर दिनेश कांबळे हे आभारप्रदर्शन करतील धम्म कवी संमेलन सायंकाळी ५.०० वाजता होईल.अध्यक्षस्थानी प्रा. सागर जाधव हे राहतील.पहीला धम्मसंवाद सायंकाळी ६ वाजता होईल.दुसरा
धम्मसंवाद सायंकाळी ७ वाजता होईल. धम्म सांस्कृतिक संध्या रात्री ९ वाजता होईल.यात राहूल साठे (मुंबई),
गुणगुण रणयेवले (औरंगाबाद) व विपीन तातड (अमरावती) हे सहभागी होतील.



