एकात्मिक आरोग्य उपायासाठी युनानी औषधांमधिल नवीन उपचार एक पर्याय- डॉ.अमिनोद्दीन सिद्दीकी

अर्धापूर:- उध्दव सरोदे – आयुष आरोग्य मंदिर,युनानी डिस्पेन्सरी अर्धापूर येथे एकात्मिक आरोग्य उपायासाठी युनानी औषधांमधिल नवीन उपचार एक पर्याय ही संकल्पना घेऊन जागतिक युनानी दिवस मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तसेच मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आमचे मार्गदर्शक मा. डॉ.श्रीकांत देसाई,तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी देवतेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली असून सेवानिवृत्त वै.अ.डॉ. अमिनोद्दीन सिद्दीकी हे प्रमुख पाहुणे तसेच व्याख्याते म्हणून जागतिक युनानी दिवस च्या अनुषंगाने उपस्थित नागरिकांना युनानी चिकित्सेचा इतिहास व सद्यस्थितीतील युनानी चिकित्सेचा विकास यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक मा.डॉ.श्रीकांत देसाई,तालुका आरोग्य अधिकारी यांनी या दिवसाचे महत्व तसेच युनानी उपचार पद्धती संदर्भात जनजागृती व्हावी,असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त औ.नि.अ.नूरल अमीन सर,फाहीमोद्दीन सर,औ.नि.अ. प्रा.आ.केंद्र येळेगाव,ता.आ.अ. कार्यालय अर्धापूर येथील कर्मचारी श्री साखरे सर,श्री.सोनवणे सर,श्री.एजाज सर,सौ.येम्मेवार मॅडम हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. औ.नि.अ.सौ.वंदना टोणपे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप मंडलवार सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.अर्धापूर परिसरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. मंडलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनानी डिस्पेन्सरी अर्धापूर येथील कर्मचारी सौ.वंदना टोणपे,औ.नि अ, सौ.जाधव पंचफुला एएनएम तसेच परिचर श्री.उबाळे सुरेश यांनी परिश्रम घेतले



