मराठवाडा

सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती तर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणास अल्पसंख्याक मंत्री भरणे यांच्या आश्वासनानंतर तात्पुर्ते स्थगित

सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती तर्फे आझाद मैदान येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास अल्पसंख्याक मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या व शासनाच्या आश्वासनानंतर तात्पुर्ते स्थगित 

दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी राज्याचे अल्पसंख्याक कॅबीनेट मंत्री दतता मामा भरणे व अल्पसख्याक मंत्रालयाचे सचिव मिलींद शिनोय, प्रशासन यांनी येत्या तीन ते चार महिण्यात तुमच्या संपूर्ण मागण्या पुर्ण करण्याच्या आश्वासनानंतर 03 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे सुरु असलेले सकल मुस्लीम समाज आरक्षण कृती समितीचे साखळी उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देऊन संपविण्यात आलेला आहे. जर शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये मुस्लिम आरक्षणची मागणी पूर्ण नाही झाली तर सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती परभणी हे पुन्हा साखळी उपोषण व आंदोलन मंत्रालय मुंबई येथे करतील.

सकल मुस्लिम समाजाच्या एक शिष्ट मंडळ अजित दादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री, मंत्रालय मुंबई यांची भेट घेऊन उपोषणाची माहिती दिली. या शिष्टमंडळात मौलाना जहांगीर नदवी, जाफर खान मुसा खान, अॅडव्होकेट इम्तियाज खान, मुदासिर असरार सर, काजी अन्सारोद्दीन, शेख असलम शेख रसुल शेख एजाज पटेल, शेख अखिल शेख रहीम, सय्यद सगीर आदी उपस्थित होते.

गेल्या 03 दिवसापासून सुरु असलेल्या हा साखळी उपोषणास सामाजिक क्षेत्रातील ही विविध संघटनाचे समर्थन मिळालेले असून हा उपोषण यशस्वी करण्याकरिता मौलाना जहांगीर नवी, अॅडव्होकेट इम्तियाज खान, मुद्दसिर असरार सर, जाफर खान साहेब, सय्यद सगीर अहमद, मौलाना जाहिर अब्बास कास्मी, हाफिज रईस, हाफिज मुनताजीब, अश्रफ खादरी, छोटू भाई गुत्तेदार, अन्वर खान युसुफ खान, शेख निहाल अहेमद, सय्यद आफरोज अमानुल्ला, मोहम्मद इलियास, आदी असंख्य कार्यकर्त्यांनी, विविध पत्रकार संघटन, समाजातील समाजसेवक इत्यादींनी सहभाग घेतला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *