जिला

पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार

 

नांदेड,२०- अर्धापूर तालुक्यातील नामांकित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गंगाधर घनश्याम सोनटक्के यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गुरु रविदास समाजसेवा मंडळ, आदिलाबाद यांच्या वतीने गुरु रविदास जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिव्हल २०२५ मध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता, गुरु रविदास मंदिर, चिलकुरी लक्ष्मीनगर, आदिलाबाद येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सतनामसिंघ सोखी यांच्या हस्ते होणार असून, सुप्रसिद्ध साहित्यिक मधू बावलकर हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

तसेच माजी मंत्री जोगू रामन्ना, आमदार पायल शंकरजी, कंदी श्रीनिवास रेड्डी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद व अर्धापूर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *