शहर

प्रभाग क्रमांक 15 येथील सीसी रस्त्याचे कॉ. गणेश शिंगे यांच्या हस्ते भूमिपूज

प्रभाग क्रमांक 15 येथील नागसेन बुद्ध विहार ते जुनागंज पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे त्या रस्त्यावरून जाण्या येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत होता संघसेन नगर हे नांदेड मनपातील कर्मचारी वसाहत व दलित वस्ती आहे. नागसेन बुद्ध विहार ते जुना गंज व चिकन मार्केट परिसरात अर्धवट राहिलेल्या रस्त्यासाठी प.पु.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे. 

सदर रस्त्याच्या आरसीसी कामाला यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे तसेच या रस्त्याचे टेंडर निघून वर्क ऑर्डर सुद्धा झालेला आहे. रस्त्याचे काम एस एस कंट्रक्शनने घेतले असून सदरचे कामास विलंब होत असल्यामुळे या रस्त्यावरील प्रचंड प्रमाणात धुळीचा त्रास होत होता त्यामुळे संगसेन नगर येथील सर्व नागरिकांनी व प्रभाग क्रमांक 13 व 15 येथील नागरिकांनी स्वाक्षऱ्याचे निवेदनदेऊन दिनांक 19 तारखेला काम सुरुवात करावी अन्यथा 20 तारखेला आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यामुळे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी काम करण्याची सक्त ताकीद संबंधित कंत्राटदारांना दिल्यानंतर दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी सदर कामाचे भूमिपूजन नांदेड वाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक व अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 15 चे माजी नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हटकर. शैलेंद्र दवणे. राजू सिंघ खेडा. गप्पी सिंघ नवाब. पूनुसिंघ गिल.राहुल कोल्हे. मोहम्मद खादिर.सुरेश पाईकराव. राहुल शिंगे.अंकित पाईकराव.सुदाम पवळे. संदीप पाईकराव .वामन बोकन. सचिन शिंगे. बंटी गायकवाड रामू कुंटे.मोहम्मद आयुब महमद. आजार बागवान. अजिंक्य गायकवाड .उत्तम पाईकराव. बबन ओढणे.जमनाबाई कांबळे.पद्मिनीबाई वाघमारे. गोदावरीबाई दवणे . सांगा पटापट इंद्रबाई दवणे .जयश्रीबाई दवणे. शशिकलाबाई दवणे. शांताबाई हनुमंते. संगीता ओढणे. कलावती विठ्ठल ताटे. भगीरथाबाई डोंगरे. भारतबाई कुंटे. इत्यादी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *