गौतम कांबळे यांची भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेड-उत्तर तालुकाध्यक्षपदी निवड

नांदेड, दि. – भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेड-उत्तर तालुकाध्यक्षपदी गौतम कांबळे यांची निवड करण्यात आली. माता रमाई आंबेडकर बुद्ध विहा, सहयोगनगर, नांदेड येथे झालेल्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली.
गौतम कांबळे हे सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी तसेच शांताई लक्ष्मण पेट्रोल पंपाचे संचालक असून, विधीतज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीनुसार धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड यांनी त्यांच्या निवडीचे पत्र दिले आहे.
या बैठकीस जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे, उपाध्यक्ष (संस्कार विभाग) सुरेश लोकडे, जिल्हा कार्यवाह सचिव सा.ना. भालेराव, दिगंबर मोरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका सरचिटणीसपदी साहेबराव डोंगरे, कोषाध्यक्षपदी प्रल्हाद जोंधळे, उपाध्यक्षपदी अंबादास कांबळे, कैलास पोहरे, भगवान धबडगे, संभाजी सोनकांबळे, अंकुश हिवाळे आदींचीही निवड करण्यात आली. गौतम कांबळे व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मित्रमंडळी व सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



