रमजानच्या काळात अल्लाची भक्ती करत शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करावे -पोलीस निरीक्षक वसंत सप्रे

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रमजान दि. 02 मार्च पासून भारतात प्रारंभ होणार असून मुदखेड पोलीस प्रशासनाने रमजान महिन्याच्या अनुषंगाने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी शांतता बैठकीचे आयोजन पोलीस ठाण्याच्या दालनात करण्यात आले होते यावेळी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी या बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की पवित्र रमजान महिन्याच्या पावित्र्य जपत अल्लाची भक्ती करत शहरात शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आपल्या भाषणाद्वारे करण्यात आली आणि देशात सुख, शांती ,समृद्धी आणि भरभराट नांदण्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करण्यासाठी सांगण्यात आले.
मुदखेड पोलीस ठाणे येथील जिल्हा विशेष शाखेचे प्रमुख हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी ठाण्याच्या दालनात शांतता बैठकीचे आयोजनाच्या सर्वांना सूचना करण्यात आली होती याप्रसंगी उपस्थित मुस्लिम नागरिकांनी आपल्या द्वारे पोलीस प्रशासनास सूचना करत सहकार्य करणार असल्याची ग्वाही वाही दिली याप्रसंगी माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करीम खान साब , माजी नगरसेविका प्रतिनिधी अब्दुल सलाम, मौलाना अशफाक मैनोदीन, काजी मशिदीचे अध्यक्ष बाबुभाई,
काँग्रेस शहर सचिव अतीक अहमद,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, भोकर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शेख इरफान , ए आय एम आय एम चे शहराध्यक्ष महंमद हुसेन,शेख मोईन फुलारी, पत्रकार हाफिझ कुरेशी शेख इमरोस उर्फ मुन्ना, गुलाम रसूल उर्फ बबलू भाई, खदिर भाई नवी आबादी, मोहम्मद जमील मधार, सय्यद हनीफ सय्यद सादिक आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी आर कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुंडे,किशोर पाटील आदींनी परिश्रम घेतले.



