कृषी

कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड येथे शेतकरी सन्मान व शेतकरी संवाद सोहळा संपन.

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे / कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड तर्फे नैसर्गिक सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकरी मित्र से.संचालक कृषीभूषण भगवान इंगोले यांचा सन्मान कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड येथे पी.एम किसान निधीच्या 19 व्या हप्त्याचे वितरण बिहार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आले असून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणयात आला. या कार्यक्रमाची सुरुवात बळीराजा आणि शेती व शेतकरी कल्याणकारी राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.प्रसंगी सत्कारमूर्ती शेतकरी बांधवांनी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या विविध योजना व प्रशिक्षणे यावरील आपले अनुभव आणि निरीक्षणे व त्यांना झालेला प्रत्यक्ष फायदा मनोगताद्वारे उपस्थित शेतकरी बांधवापुढे व्यक्त केला.

त्यानंतर भारतीय कृषी अनुसंधान परिषद गीताने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या प्रयोगशील,प्रगतिशील शेतकरी बांधवांचा नांदेड उत्तर चे लोकप्रिय आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मालेगाव येथील प्रगतीशील सेंद्रिय शेतकरी कृषीभषुण भगवान इंगोले,अमोल सावंत,दत्तात्रेय कदम, संजय घुगे,दत्तात्रेय कदम,संजय सूर्यवंशी,विश्वंभर कदम,रत्नाकर ढगे,गजानन तिमेवार,रत्नाकर ढगे,विश्वनाथ होळगे या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.कृषी भूषण भगवानभाई इंगोले यांनी सेंद्रिय शेती कशी करावी या बाबत सविस्तर अशी माहिती देवून आय.सी.ए.आर (ICAR)- जे.एन.आय.ई एस.टी.आर याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शेतकरी शास्त्रज्ञ संवाद व जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी बांधव व भगिनींचा शाल,पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नांदेड उत्तरचे लोकप्रिय आ.श्री बालाजीराव कल्याणकर उपस्थित होते तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री‌.दत्तकुमार कळसाईत, श्री.संजयजी चातरमल,तालुका कृषी अधिकारी नांदेड,मंडल कृषी अधिकारी व सर्व कृषी कर्मचारी,डॉ. देविकांत देशमुख‌,प्राचार्य जायभाय सर महेश अंबोरे सर तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्याणकर सर यांनी करून याप्रसंगी उपस्थित सर्व शेतकरी बांधव,भगिनी, लोकप्रतिनिधी,पत्रकार बांधव,कृषी अधिकारी व कर्मचारी या सर्वांचे आभार मानण्यात आले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *