राजकारण

डॉ. सानवी जठवानी यांच्या नेतृत्वाखाली २३ जिल्ह्यांतील ७७ ट्रान्सवुमन आणि ट्रान्समेनसह मोठ्या प्रमाणावर ट्रान्सजेंडर समुदाय भाजपमध्ये प्रवेश

 

मुंबई, दि. १९ मार्च २०२५ – महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आणि सामाजिक नेत्या डॉ. सानवी जठवानी यांनी आपल्या नेतृत्वाखाली २३ जिल्ह्यांतील ७७ ट्रान्सवुमन आणि ट्रान्समेनसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. हा प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, डॉ. सानवी जठवानी यांच्या नेतृत्वाखाली ट्रान्सजेंडर समुदायाला न्याय मिळेल, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील आणि त्या लवकरच भाजपच्या ट्रान्सजेंडर सेलच्या प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रान्सजेंडर समाजाच्या कल्याणासाठी नवी दारे खुली होतील आणि विविध योजनांद्वारे त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सानवी जठवानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले, “ट्रान्सजेंडर समुदायाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ३ लाखांहून अधिक ट्रान्सजेंडर समुदाय भाजपमध्ये सामील होतील, असा विश्वास आहे. रोजगार, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू.”

या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील ट्रान्सजेंडर समुदायाला राजकीय आणि सामाजिक स्तरावर नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *