शहरात चर्चा फक्त अमीर हमझाचीच, भोकर विधानसभेत मतदार संघात एम आय एम पक्षाची अनपेक्षित एन्ट्री

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
मुदखेड नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी संपन्न झाली निवडणुकीची मतमोजणी दि. 21 डिसेंबर रोजी घोषित करत भोकर विधानसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलिमिन या राजकीय पक्षाचे नगर परिषदेत निवडणुकीत तीन उमेदवारांपैकी तब्बल दोन उमेदवारांना मतदारांनी निवडून देत भोकर विधानसभेच्या मतदार संघात स्थान उपलब्ध करून देत मार्ग मोकळा करून दिला.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक पाच हा खूपच चर्चिला जात होता कारण या प्रभागातून प्रतिष्ठित असलेल्या स्थानिक नेत्यांचा राजकीय भवितव्य पणाला लागली होती काँग्रेस पक्षाचे माजी नगर सेवक बबलू सेठ याला पक्षाने नगर सेवकाचा टिकट नाकारल्याचा आरोप करत थेट ए आय एम आय एम या पक्षात प्रवेश करत आपल्या लहान बंधू मोमीन आमिर हमजा अब्दुल हमीद याला प्रभाग क्रमांक पाच ब सर्वसाधारण या गटातून उमेदवारी घेत राजकीय झुंज देण्याचा डाव आखला होता काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजातील ज्येष्ठ असलेले प्रभावी म्हणून परिचित असलेले माजी नगरसेवक शेख करीम शेख सादात यांना उमेदवारी जाहीर केली होती,
भारतीय जनता पार्टी कडून माजी उपाध्यक्ष खुर्शीद सेठ यांच्या सुपुत्र मोहम्मद सिराज मोहम्मद खुर्शीद, काँग्रेस पक्षाचे माजी तालुका कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक मोहम्मद गौस यांचे बंधू अब्दुल मुकिद अब्दुल नबी, शिवसेना शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार अब्दुल अजीज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गट मोहम्मद अन्सार मोहम्मद इलियास अशी पचरंगी राजकीय फडात शेवटी या भागातील मतदारांनी एम आय एम च्या उमेदवाराला 429 मते देत त्यांचे निकटवर्तीय काँग्रेस पक्षाचे करीम खान साबला एम आय एम चे अमीर हमझा यांनी एकूण 80 मताधिक्यांने पराभूत करत विजयश्री खेचून आणला.
नवनिर्वाचित नगरसेवक अमीर हमज हे बीएससी बीएड उच्च प्रशिक्षित असून नगरसेवक म्हणून आपल्या कार्यकाळात रचनात्मक आणि विधायक कामांसाठी पुढाकार घेत वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दैनिक जगमित्र यांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले विशेष म्हणजे माजी नगरसेवक तथा एमआयएमचे किंग मेकर म्हणून बबलू सेठ यांची ओळख नांदेड जिल्ह्यात निर्माण झाली असून त्यांच्या सोबतीला एमआयएमचे शहराध्यक्ष मोहम्मद हुसेन पीर मोहम्मद यांनी सुद्धा खूप मदत करत जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून यावे यासाठी कठीण परिश्रम केले



