स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगचे कामामूळे रद्द करण्यात आलेली तांदूर एक्स्प्रेस अंशतः रद्द

येरमारस -रायचूर – मारिचेथल या स्थानकांवर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगचे कामामूळे नॉन-इंटरलॉकिंग च्या कार्याला मान्यता दिली आहे,. त्या मुळे काही रेल्वे गाड्यांच्या परीचालनावर परिणाम झाला आहे.
या कार्यालयाने आज दिनांक 02 एप्रिल रोजी प्रेस नोट क्रमांक 729 नुसार गाडी संख्या 17664 हुजूर साहिब नांदेड – रायचूर एक्स्प्रेस दिनांक 04 एप्रिल रोजी आणि गाडी क्रमांक 17663 रायचूर – परभणी एक्स्प्रेस दिनांक 05 एप्रिल रोजी पूर्णतः रद्द करण्यात आल्याचे कळविले होते.
परंतु हि रद्द करण्यात आलेली एक्स्प्रेस आता अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ते पुढील प्रमाणे — अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1) दिनांक 04 मार्च 2025 रोजी हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 17664 हुजूर साहिब नांदेड – रायचूर एक्स्प्रेस ही गाडी तांदूर – रायचूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
2) दिनांक 05 मार्च 2025 रोजी रायचूर येथून सुटणारी गाडी संख्या 17663 रायचूर – परभणी एक्स्प्रेस ही गाडी रायचूर – तांदूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली



