नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई – कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान घातक शस्त्रांचा कारखाना उध्वस्त

नांदेड: नांदेड ग्रामीण पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एका मोठ्या कारवाईत घातक शस्त्रनिर्मितीचा अवैध कारखाना उध्वस्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर देशी कट्टे, तलवारी, चाकू आणि इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान घातक हत्याराचा कारखाना केला उध्वस्त यांचे मार्गदर्शनाखाली अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, साहेब, नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड
कॉबिंग ऑपरेशन दरम्यान कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व अमंलदार ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, सुरेश ए मान्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण., सचिन गडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, बाबुराव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण
पोलीस अमंलदार पोहेकॉ/2445 शिंदे, पोहेको/492 जाधव, पोहेकों/50 जगताप, पोहेकॉ/642 जाधव, पोहेकों/173 माने, पोकों/1668 गरड, पोकों/1069 शिरगिरे, पोकों/ 1500 सिरमलवार, पोकों/946 कल्यानकर, पोकों/916 भिसे, पोकी/2907 कलंदर, पोकों/221 माने, मपोशी/1195 घोनशेटवार, मपोशी /1342 वाडीकर, मपोकों/728 कंधारे
आरोपीचे नाव व पत्ता
1) करणसिंघ किशनसिंघ बाबरी वय 34 वर्ष, 2) कालुसिंघ किशनसिघ बावरी वय 32 वर्ष, 3) सागरसिंघ किशनसिंघ बावरी वय 30 वर्ष, 4) आकाशसिघ करणसिंघ बावरी वय 29 वर्ष, 5) मनजीतसिंघ किशनसिंघ बावरी वय 25 वर्ष, 6) बलजितसिघ बबनसिंघ बावरी वय 48 वर्ष, 7) गुलाबसिंघ भगवानसिंघ बावरी बय 42 वर्ष, सर्व रा. जुनाकौठा ता.जि. नांदेड
जप्त मुद्देमाल
1) अकरा (11) तलवारी ज्याची किंमती 5,500/-रुपये 2) तिन लहान आकाराची तलवार किंमती 900/-रुपये 3) अकरा (11) लोखंडी खंजर किमंती 3300/-, रुपये 4) दोन लोखंडी कत्ते किमंती 200/-रुपये 5) दोन लोखंडी कुन्हाड किमंती 200/-रुपये 6) चार तलवारीच्या लोखंडी मुठ किमंती 400/-रुपये 7) चार कानसी किमंती 400/-रुपये 8) पाच लोखंडी पट्टे तलवारी बनविण्याचा कच्चा माल किमंती 800/-रुपये 9) दोन लोखंडी लाल तलवार खंजर बनविण्यासाठी ची पट्टी किमंती 400/-रुपये 10) एक भट्टी (भट्टा) किमंती 1000/-रुपये, 11) एक सांडस किमंती 100/-रुपये 12) एक काळयारंगाची एअर गण किमंती 3000/- रुपये 13) लोखंडी तिन ऐरन किमंती 2000/-रुपये 14) एक लोखंडी मंगल (चिमटा) किंमती 2000/-रुपये 15) एक लालरंगाची ड्रिल मशीन किमंती 1000/-रुपये 16) चार लोखंडी हातोडे किमंती 600/-रुपये 17) दोन लोखंडी छन्या किमंती 100/-रुपये 18) एक बंदुकीचा लोखंडी ढाच्या किमंती 200/-रुपये 19) एक फी कुऱ्हाड किमंती 200/-रुपये 20) पाच टोकदार लाकडी भाले किमंती 500/-रुपये 21) लाकडी मॅन असे हत्यारे व हत्यारे बनवीण्याचे तांत्रीक साहीत्य असे एकूण 65 हत्यारे ज्याची एकुण किमंत 24300 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



